जळगाव, दि. 7 - मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात 109 कोटी 62 लाख 38 हजार रुपये खर्चाची 210 किमी लांबीच्या 36 रस्त्यांची कामे सुरु आहेत. यापैकी 50 किलोमीटर लांबीच्या 9 रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहे तर 27 कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर आजपर्यंत 32 कोटी 29 लाख 10 हजार खर्च करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्यात सन 2015 मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 30 हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यात येणार आहे. तर 703 किलोमीटर लांबीचे नवीन रस्ते बनविण्यात येणार आहे. यासाठी 13 हजार 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात अंदाजे 85 किलोमीटर लांबीचे नवीन रस्ते बनविण्यात येणार आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत ज्या गावांचा समावेश करण्यात आलेला नाही. अशा गावांचा समावेश मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत करण्यात येणार आहे. राज्यातील 500 पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ज्या गावातील रस्त्यांवर एसटी बस सुरु आहे. अशा गावांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून सन 2015-16 मध्ये 64.51 किलोमीटर लांबीची 14 कामे मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी 50 किलोमीटर लांबीच्या 9 रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर 14.51 किलोमीटर लांबीची 5 कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांचा अंदाजित खर्च 34 कोटी 99 लाख 14 हजार रुपये इतका असून यापैकी 21 कोटी 55 लाख 47 हजार खर्च करण्यात आला आहे.
या कामांमध्ये एरंडोल तालुक्यातील खडकेसिम ते जवखेडेसिम, भडगाव तालुक्यातील कजगाव ते वाडे, अमळनेर तालुक्यातील ढेकूसिम आटाळे पिंपळे चिमणपुरी ते आर्डीअ, पारोळा तालुक्यातील प्रजिमा 46 ते चबुत्रा वडगाव रोड, चाळीसगाव तालुक्यातील राज्यमार्ग 19 ते आडगाव ते उबरखेड, बहाळ ते प्रजिमा 40, गणेशपुर ते ओढरा, चोपडा तालुक्यातील राज्यमार्ग 4 धानोरा ते कमळगाव, धरणगाव तालुक्यातील प्रजिमा 58 ते (सोनवद खुर्द) हनुमंतखेडा, जळगाव तालुक्यातील धानवड ते धानवड तांडा, जामनेर तालुक्यातील पहूर कसबे ते जामनेर तालुका हद्द, मुक्ताईनगर तालुक्यातील राज्य मार्ग 6 ते सालबर्डी ते चांगदेव देवस्थान, पाचोरा तालुक्यातील राजूरी ते शिंदाड, रावेर तालुक्यातील सावदा ते रायपूर (थोरगव्हाण ते रायपूर) या रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.
सन 2016-17 या वर्षामध्ये 74 कोटी 63 लाख 24 हजार रुपयांच्या 145.43 किलोमीटर लांबीच्या 22 कामांना मंजूरी देण्यात आली आहे. सध्या ही कामे प्रगतीपथावर असून या कामांवर 10 कोटी 73 लाख 63 हजार रु पये खर्च झाला आहे. या कामांमध्ये अमळनेर तालुक्यातील मारवड खेडी वासरे ते शहापुर रस्ता, राज्यमार्ग 6 ते कळंब रस्ता, बोदवड तालुक्यातील बोदवड शेलवड ते प्रराम 5 रस्ता, भुसावळ तालुक्यातील राज्यमार्ग 6 ते वाजोंळा सुनसगाव रस्ता, धरणगाव तालुक्यातील पाळधी रेल लाडली चांदसर ते कवठळ रस्ता, जामनेर तालुक्यातील सामरोद ते चिंचोली प्रिंपी रस्ता, पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा खाजोळा ते सार्वे रस्ता, रावेर तालुक्यातील राज्यमार्ग 4 ते धुरखेडा रस्ता, यावल तालुक्यातील राज्यमार्ग 4 ते सांगवी बु. ते सातोद ते आसराबारी रस्ता, पारोळा तालुक्यातील राज्यमार्ग 39 ते आडगाव - सावखेडा ते करमाड खुद रस्ता, चोपडा तालुक्यातील राज्यमार्ग 4 ते अंजटीसिम रस्ता, एंरडोल तालुक्यातील कासोदा कनाशी उमरे मालखेडा ते तालुका हद्द रस्ता, भडगाव तालुक्यातील नगरदवेळा कनासी रस्ता, पाचोरा तालुक्यातील बिल्दी लोहारा कु-हाड लाख ते जामनेर तालुका हद्द, आणि राज्यमार्ग 19 ते एकलुती बु. रस्ता, मुक्ताईनगर तालुक्यातील राज्यमार्ग 47 (बोदवड फाटा) माधापुरी रस्ता, जळगाव तालुक्यातील असोदा ते देऊळवाडे, पारोळा तालुक्यातील टिटवी ते टिटवीसिम रस्ता, चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव बहाळ ते प्रजिमा 40 टेकवाडे खु. रस्ता, रावेर तालुक्यातील राज्यमार्ग 4 ते भोकरी ते जुनाने रस्ता, मुक्ताईनगर तालुक्यातील राज्यमार्ग 47 ते कु-हा ते तालुका हद्द रस्ता, जळगाव तालुक्यातील एस.एच.40 ते कानळदा ते इदगाव तालुका हद्द रस्ता या रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे.
या रस्त्यांच्या माध्यमातून राज्यात रस्त्यांचे भक्कम जाळे निर्माण करण्यात येत असून दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन प्राधान्य देत आहे.

0 0 0 0
No comments:
Post a Comment