Friday, 17 November 2017

दहावी व बारावी परीक्षेचे परीक्षा शुल्क निश्चित जादा शुल्क घेणाऱ्यांवर होणार कारवाई



           जळगाव दि. 17 :- उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च, 2018 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांकरिता मंडळामार्फत परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे. त्याप्रमाणेच परीक्षा शुल्काची आकारणी करण्यात यावी. यापेक्षा अधिक शुल्क आकारणाऱ्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा मंडळाचे विभागीय सचिव आर. आर. मारवाडी यांनी दिला आहे.
            इयत्ता 12 वी कला व वाणिज्य शाखा परीक्षेसाठी चारशे तीस रुपये तर विज्ञान शाखेसाठी चारशे तीस रुपये व प्रात्यक्षिक शुल्क विषयनिहाय रुपये 15, श्रेणी सुधार योजनेअंतर्गत प्रविष्ठ होणाऱ्या परीक्षार्थींचे शुल्क रुपये आठशे इतके आहे. तर इयत्ता 10 वी (नियमित व पुर्नपरीक्षार्थी) साठी चारशे पाच रुपये तर श्रेणी सुधार योजनेअंतर्गत प्रविष्ठ होणाऱ्या परीक्षार्थींचे शुल्क आठशे रुपये इतके आहे.
            असे असूनही काही प्राचार्य, मुख्याध्यापक विद्यार्थ्यांकडून जादा परीक्षा शुल्क स्वीकारीत असल्याच्या तक्रारी आहे. प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी जादा परीक्षा शुल्क स्विकारु नयेत. तसेच पालक, विद्यार्थी यांनीही जादा शुल्क न भरण्याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. याबाबत संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास शासन व मंडळामार्फत नियमानुसार योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.असे आर. आर. मारवाडी, विभागीय सचिव, नाशिक विभागीय मंडळ, नाशिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्व्ये कळविले आहे.
000000

No comments:

Post a Comment