Monday, 13 November 2017

भारतीय रिझर्व बँकेच्यावतीने आज उद्योजकांसाठी बैठकीचे आयोजन उद्योजकांना आपल्या समस्या सोडवून घेण्याची संधी


          जळगाव दि. 13 :- खान्देशातील सूक्ष्म, लघु व मध्यम (MSME) उद्योजकांसाठी भारतीय रिझर्व बँक मुंबईच्या वतीने वित्तीय समावेशन विभागातर्फे आज (14 नोव्हेंबर 2017) रोजी  जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दुपारी 3 वाजता बैठकीचे (टाऊन हॉल मिटिंग) आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा लिड बँकेचे समन्वयक श्री. दामले यांनी दिली.
            या बैठकीस प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर हे उपस्थित राहणार असून रिझर्व बँक, उद्योग, नाबार्ड, सिडबी, आणि जळगाव व धुळे जिल्ह्यातील सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित राहून उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत.
            या बैठकीत उद्योजकांना आपल्या सूचना, समस्या बँकेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडून सोडवून घेता येणार आहे. या बैठकीचे विशेष म्हणजे अशा प्रकारची बैठक खान्देशात प्रथमच होत असल्याने लघू, सूक्ष्म, मध्यम उद्योजकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. दामले यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment