Monday, 27 November 2017

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ४ डिसेंबर रोजी



        जळगाव, दि. 27 - दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार 4 डिसेंबर, 2017 रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
            जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्‍यात येते. त्यानुसार सोमवार 4 डिसेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनी नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात आणाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी केले आहे.                
०००००

No comments:

Post a Comment