जळगाव, दि. 1 – पाचोरा विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू
देणार नाही. असे आश्वासन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
पाचोरा नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती
नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत पाचोरा शहर भुमीगत गटार योजना 55 कोटी 22 लाख
रुपये वैशिष्टपुर्ण योजने अंतर्गत महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय इमारत बांधकाम
3 कोटी 20 लाख रुपये, प्रभाग क्र. 3, 6 व
13 मध्ये पुरुष व महिलांसाठी सुलभ शौचालय (6 युनिट) 1 कोटी 65 लाख रुपये असे एकूण
60 कोटी 7 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि आमदार किशोर
पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या
उपस्थितीत करण्यात आला.
या कार्यक्रमास पाचोराचे आमदार किशोर पाटील,
चोपड्याचे आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार आर.ओ. पाटील, कैलास पाटील, नगराध्यक्ष सुनील गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटील,
तहसीलदार कापसे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी
यांचेसह नगरपरिषदेचे नगरसेवक, तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती
सदस्य तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाचोरा नगरपरिषदेच्या वतीने नागरीकांना आवश्यक त्या
पायाभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आहे. यापुढे या मतदार संघाच्या विकासासाठी
लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी स्वतः आमदार पाटील यांच्या सोबत शासनाकडे
पाठपुरावा करील. असे आश्वासन राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात नगरपरिषदेचे
मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी नगरपरिषदेच्यावतीने केलेल्या, सुरू असलेल्या व
यापूढे करण्यात येणारा कामांची माहिती दिली.
कार्यक्रमाची सुरुवात छञपती शिवाजी महाराजांच्या
पुतळ्यास पुष्षहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आमदार
किशोर पाटील यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
तसेच महिला बचत गटांच्या प्रतिनिधींना धनादेशाचे
वाटप करण्यात आले. तर स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणारे
नगरपरिषदेचे कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
00000
No comments:
Post a Comment