जळगाव, दिनांक 23 :- कृषि विभागामार्फत
कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा.
कार्यालयीन कामकाजामध्ये खेळीमेळीचे वातावरण निर्माण होवुन एकमेकांशी स्नेहसंबंध
जोपासले जावा. या हेतुने जिल्हास्तरीय 24 ते 26 जुलै दरम्यान क्रीडा स्पर्धा व
सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या
महोत्सवाचे उद्घाटन 24 नोव्हेंबर,2017 रोजी सकाळी 8.30 वाजता पोलिस कवायत मैदान,
जळगाव येथे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचे हस्ते होणार आहे. जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलिस अधिक्षक
दत्तात्रय कराळे, उपवनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी, विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक
विभाग, नाशिक दिलीप झेंडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे हे प्रमूख
पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
क्रीडा
स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात किक्रेट, बॅटमिंटन, व्हॉलीबॉल, कबड्डी, जलतरण,
रस्सीखेच, 100 मीटर धावणे, 200 व 400 मीटर चालणे, कॅरम, टेबल टेनिस, बुध्दीबळ
आदीच्या स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नृत्य, गायन,
वादन, नाटक, एकांकीका व मिमिक्री या
कार्यक्रमांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन जळगाव
जिल्हास्तरीय क्रीडा समितीचे सचिव प्रविण आवटे व अध्यक्ष, तथा कृषि उपसंचालक, अनिल भोकरे यांनी
केले आहे.
0 0 0 0
No comments:
Post a Comment