Thursday, 9 November 2017

डाक अदालतीचे 11 डिसेंबर रोजी आयोजन



        जळगाव, दि. 9:-  पोस्टाच्या कामासंबंधीच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अधिक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव येथे 11 डिसेंबर, 2017 रोजी दुपारी चार वा. डाक अदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अधिक्षक, डाकघर यांनी दिली आहे.
            नागरिकांनी आपल्या तक्रारी संपूर्ण माहितीसह दोन प्रतीत अधिक्षक, डाकघर कार्यालय, पहिला मजला, हेड पोस्ट ऑफिस बिल्डींग, जळगाव या पत्त्यावर 4 डिसेंबर, 2017 पूर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवाव्यात. मुदतीनंतर आलेल्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नसल्याचे अधिक्षक, डाकघर यांनी कळविले आहे.
०००००

No comments:

Post a Comment