जळगाव,
दि. 20 - राज्यातील,
जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांना युवा
विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी शासनामार्फत एक
युवक, एक युवती व एक नोंदणीकृत संस्था यांना राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार
देण्यात येतो. सन 2017-18 या वर्षापासून जिल्हास्तर व राज्यस्तर युवा
पुरस्काराकरिता 4 डिसेंबर 2017 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती
जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी दिली.
जिल्हा व राज्य युवा पुरस्काराकरिता कार्यालयातून
अर्ज घेवून जाण्याचा दिनांक 27 नोव्हेंबर, 2017असून ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक 4
डिसेंबर 2017 आहे. अर्जदाराने प्रस्तावाची हार्ड कॉफी कार्यालयात जमा करण्याची अंतिम
तारीख 8 डिसेंबर 2017 ही आहे. ऑनलाईन अर्ज Jalgaonsports.in या वेबसाईटवर भरावा. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अधिक माहितीसाठी श्री.
संजय महिरे, मो. नं. 8552858001, श्री.
अमित मनोरे, मो. न. 9175330285 व सौ. रेखा पाटील मो.न.9421693471 यांचेशी संपर्क
साधावा.
जिल्हा
युवा पुरस्कार :- जिल्हा युवा पुरस्कार हा जिल्हास्तरावर एक युवक व एक युवती
तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना देण्यात येतो. या पुरस्काराचे अर्ज विहित नमुन्यात
भरुन केलेल्या कामाचे योग्य ते सबळ पुरावे (वृत्तपत्रीय कात्रणे, प्रशस्तीपत्र,
चित्रफीत व फोटो इत्यादी) जोडावे.
राज्य
युवा पुरस्कार :- राज्यस्तरावर पुरस्कार निवड करतांना क्रीडा विभागाचे
क्षेत्रीय विभागानुसार एक युवक व एक युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांना
पुरस्कार देण्यात येईल. या पुरस्काराचे अर्ज विहीत नमुन्यात भरुन केलेल्या कामाचे
योग्य ते सबळ पुरावे (वृत्तपत्रीय कात्रणे, प्रशस्तीपत्र, चित्रफीत व फोटो
इत्यादी) जोडावे. राज्यस्तर युवा पुरस्कारासाठी प्राप्त अर्जापैकी एक युवक व एक
युवती तसेच एक नोंदणीकृत संस्था यांचे अर्ज व प्रस्ताव हे जिल्हास्तर निवड समिती,
जळगाव यांच्या पुढे सादर करण्यात येतील. व
ते राज्यस्तरासाठी पाठविण्यास योग्य असल्यास जिल्हा निवड समितीच्या शिफारशीने
आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, शासकीय मध्यवर्ती इमारत, पुणे 411001
यांच्याकडे सादर करण्यात येईल.
जिल्हा व राज्य पुरस्काराकरिता अर्जदार
युवक, युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्ष पूर्ण व 31 मार्च रोजी
35 वर्षापर्यंत असावे. दोन्ही पुरस्कारासाठी अर्ज करणा-या युवक, युवती व युवा
विकासाचे कार्य करणा-या संस्थांनी केलेली कार्य ही 1 एप्रिल ते 31 मार्च या
कालावधीत गेल्या तीन वर्षात केलेली कामगिरी विचारात घेतली जाईल. विहित नमुन्यतील
अर्ज पुरस्काराच्या अटी व शर्ती व इतर माहितीसाठी इच्छुकांनी व्यक्तीश: जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा
विभाग शासन निर्णय क्र युकयो-2012/प्र.क्र.65/क्रीयुसे-3 दिनांक 12 नोव्हेंबर 2013
बघावा. विहित मुदती प्रमाणे प्रस्ताव अर्जदाराने Jalgaonsports.in या वेबसाईटवर
जावुन ऑनलाईन अर्ज भरुन संबंधित संपूर्ण कागदपत्रे अपलोड करावे. त्यानंतर सर्व
कागदपत्रांसह अर्जाची हार्डप्रत कार्यालयात जमा करावी. असे जिल्हा क्रीडा अधिकारी
श्रीमती सुनंदा पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment