जळगाव, दिनांक 18 - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान नगरपालिका, भुसावळ यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवार 24 नोव्हेंबर,2017 रोजी नगरपालिका हॉल, रेल्वे स्टेशन जवळ, भुसावळ येथे सकाळी दहा वाजता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अनिसा तडवी, सहायक संचालक यांनी दिली आहे.
या रोजगार मेळाव्यात जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारांची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सहा उद्योजक उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यामार्फत एकूण 200 रिक्त पदांसाठी निवड करण्यात येणार आहे. कौशल्य विकास अभियानातंर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण मार्गदर्शनासाठी तालुक्यातील व्यवसाय प्रशिक्षण संस्थाही यावेळी उपस्थित राहणार आहेत. या सुवर्ण संधीचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी किमान पाच प्रतीत बायोडाटा व पासपोर्ट साईजचे छायाचित्र, आधारकार्ड आणि सेवायोजन नोंदणी कार्डसह उपस्थित रहावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केलेली नसल्यास www.mahawayam.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच यापूर्वी महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केलेली असल्यास या संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि भ्रमणध्वनी क्रमांक व आधार क्रमांकाची पडताळणी करावी. असे आवाहन श्रीमती तडवी, सहाय्यक संचलक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
0 0 0 0

No comments:
Post a Comment