जळगाव, दि. १५- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळ, पुणे यांचेमार्फत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा
फेब्रुवारी-मार्च २०१८ साठी खाजगीरित्या प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांचे नाव
नोंदणी अर्ज विलंब शुल्कासह २२ नोव्हेंबर पर्यत तर अति विलंब शुल्कासह ३०
नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात
येणार आहेत.
विलंब शुल्क प्रती विद्यार्थी शंभर रुपये स्वीकारुन माध्यमिक शाळांनी
ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज भरावयाच्य तारखा इयत्ता १० वी १३ ते २२ नोव्हेंबर
२०१७, विलंब शुल्क प्रती विद्यार्थी रुपये २५ स्वीकारुन कनिष्ठ महाविद्यालयांनी
ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज भरावयाच्या तारखा इयत्ता १२ वी साठी १३ ते २२
नोव्हेंबर २०१७, माध्यमिक शाळांनी, कनिष्ठ महाविद्यालयांनी विलंब, अति विलंब शुल्क
रुपये २० प्रतिदिन स्विकारुन विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी अर्ज
भरावयाची तारीख इयत्ता १० वी व १२ वी साठी २३ ते ३० नोव्हेंबर, २०१७ अशी आहे. असे
सचिव, राज्यमंडळ, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment