Tuesday, 7 November 2017

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा

          जळगाव, दि. 7 - राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. चंद्रकांत पाटील हे बुधवार दि. 8 व गुरुवार 9 नोव्हेंबर 2017 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
          बुधवार दि. 8 रोजी सांय. 5 वा. औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. रात्री 7 वा. 30 मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. रात्री 8 वा. 30 मि.नी. जळगाव येथील पत्रकार बंधूसमवेत वार्तालाप, (स्थळ : ऑफिसर्स क्लब, जळगाव.) रात्री सोयीनुसार अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व मुक्काम.
           गुरुवार दि. 9 रोजी सकाळी 7.45 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे राखीव. सकाळी 8.00 वा. सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव येथील मुख्य अभियंता ते कनिष्ठ अभियंता यांच्या समवेत खड्डेमुक्त रस्ते अभियान, इमारती व रस्त्यांची प्रलंबित कामे व क्षेत्रीय स्तरावरील कार्य पध्दतीचा सविस्तर आढावा बैठक. स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव. सकाळी 11 वा. रुरर्बन बाबत आढावा बैठकीस उपस्थिती स्थळ : अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव. सकाळी 11 वा. 30 मि.नी. जळगाव जिल्हयातील मा. संसद सदस्य, वि.प.स./वि.स.स. यांच्यासमवेत चर्चेसाठी राखीव. स्थळ : अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव.  दुपारी 12 वा. 30 मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे राखीव. दुपारी 2 वा. सन 2017-2018 च्या पाणी आरक्षण व पाणी टंचाई आढावा बैठक, स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव. दुपारी 4 वा. जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत कार्यकारी परिषद यांची आढावा बैठक, स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव. सांय 4 वा. 30 मि.नी. जळगाव शहराच्या विविध प्रश्नांबाबत आढावा बैठक, स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव. सायं 5 वा. नागरिकांच्या समस्या सोडविणे, निवेदने व सूचना स्किारण्यासाठी राखीव. सांय सोयीनुसार अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. रात्री 9 वा. 30 मि.नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने जळगाव रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 9 वा. 55 मि.नी. जळगाव रेल्वे स्थनाक येथे आगमन व आझादहिंद एक्सप्रेसने पुणेकडे रवाना.
                                                                     00000

No comments:

Post a Comment