जळगाव, दि. 20 - पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे सहा आठवड्याच्या
आत निराकरण झाले नाही व समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अशा तक्रारींच्या
निराकरणासाठी चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय,
मुंबई जी.पी.ओ. बिल्डिंग, दुसरा माळा, मुंबई 400001, येथे 28 डिसेंबर, 2017 रोजी दुपारी चार वाजता डाक अदालतीचे आयोजन
करण्यात आले आहे.
या
डाक अदालतमध्ये टपाल, वस्तु, स्पीड पोस्ट,
बचत बॅंक, मनीऑर्डर या संदर्भातील तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा
उल्लेख सर्व तपशिलासह करावा. डाकसेवेबाबची तक्रार दोन प्रतीत श्री. आर.एन.चेटुले,
सहाय्यक निदेशक (तक्रार) तथा सेक्रेटरी डाक अदालत, चीफ पोस्टमास्तर जनरल,
महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे कार्यालय, मुंबई जी.पी.ओ. बिल्डिंग, दुसरा माळा,
मुंबई 400001 यांच्या नावे 8 डिसेंबर पूर्वी पोहोचेल या बेताने पाठवावी. असे आवाहन
मुख्य पोस्टमास्टर जनरल यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment