Tuesday, 21 November 2017

आदिवासी उमेदवारांना कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्रात प्रवेशासाठी 29 नोव्हेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन



         जळगाव, दि. 21 - आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर येथे 1 डिसेंबर, 2017 पासून प्रशिक्षण सत्र सुरु होणार आहे. या प्रशिक्षणास प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे 29 नोव्हेंबर 2017 पर्यंत कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट नं. 2, शनि मंदीरामागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर या कार्यालयात सादर करावीत. असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, रावेर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
            प्रशिक्षणात आदिवासी उमेदवरांना विविध संस्थामार्फत घेतल्या जाणा-या स्पर्धा (इंग्रजी/सामान्य ज्ञान/गणित/बौधिक चाचणी) परिक्षांची तयारी करुन घेतली जाते. प्रशिक्षणाकरीता उमेदवार आदिवासी (अनु.जमाती) या प्रवर्गाचा असावा. प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महिन्याचा असून प्रशिक्षण काळात प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते.
          प्रशिक्षणाकरीता इच्छूक उमेदवारांनी 29 नोव्हेंबर, 2017 रोजी सकाळी 11 वाजता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. आदिवासी जमातीमधील उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेचे मूळ प्रमाणपत्रे व जातीच्या प्रमाणपत्राच्या व त्यांच्या साक्षांकित झेराक्स प्रती, नांव नोंदणीचे ओळखपत्र आणि पासपोर्ट साईजचे दोन फोटो सोबत आणावे.       
            प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वत: करावी लागेल. मुलाखतीसाठी कोणताही प्रवासखर्च दिला जाणार नाही. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02584-251906 वर संपर्क साधावा.  असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, रावेर यांनी कळविले आहे.
०००००

No comments:

Post a Comment