जळगाव,
दि. 3 - संत रोहिदास चर्मोद्दोग व चर्मकार विकास महामंडळ यांचेमार्फत चांभार, ढोर,
मोची, होलार या सर्व वर्गातील होतकरू तरुणांसाठी फुरसतगंज अमेठी, उत्तर प्रदेश
येथे दोन महिन्याचे (डिसेंबर व जानेवारी) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी 14 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे
आवाहन संत रोहिदास चर्मोद्दोग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी
केले आहे.
या
प्रशिक्षणात Certicate Program in Cutting Operator-Footwear आणि Certicate
Program in Cutting Operator-Footwear याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी अटी व शर्ती याप्रमाणे-
लाभार्थ्यांचे वय 18 ते 35 वर्षे असावे. लाभार्थ्यांची शैक्षणिक पात्रता 8 वी पास
असावी. अर्जासोबत जातीचा दाखला, जन्मतारखेचा दाखला, रेशन कार्ड, फोटो, आधार कार्ड
आदि कागदपत्रे जोडलेली असावी.
या
प्रशिक्षणाचा लाभ घेवू इच्छिणाऱ्यांना जिल्हा कार्यालयामार्फत अर्जांचे वाटप 13 ते
14 नोव्हेंबर 2017 पर्यंत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी सादर
केलेल्या अर्जांची छाननी 16 व 17 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असून लाभार्थ्यांची
मुलाखत व निवड 20 ते 22 नोव्हेंबर 2017 पर्यंत करणार आहे.
या
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात अथवा
0257-2264464 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन विभागीय अधिकारी आर.
व्ही. देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
00000
No comments:
Post a Comment