Friday, 3 November 2017

पक्षी संगोपन योजनेसाठी अर्ज केलेल्या इच्छूकांनी 6 नोव्हेंबर रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन



            जळगाव, दि. 3 - संकरीत गाई, म्हशींचे वाटप करणे, शेळीपालन करणे, मांसल कुक्कुट पक्षी संगोपनातून कुक्कुटपालन व्यवसाय करणे. या योजना जिल्हास्तरावर राबविण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय समितीची स्थापन करण्यात आली आहे. या योजनांसाठी इच्छुक लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी या समितीची बैठक सोमवार 6 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
            या योजनांसाठी अर्ज केलेल्या इच्छुक लाभार्थ्यांना निवड प्रक्रियेच्या वेळी उपस्थित रहाण्याची इच्छा असेल त्यांनी 6 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, जळगाव यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.
000

No comments:

Post a Comment