जळगाव दि. 6- चोपडा दुय्यम कारागृहातील वर्ग 2 च्या कैद्यांना 1 जानेवारी
2018 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीसाठी चहा, न्याहारी व शिजवून तयार केलेले अन्न
तसेच पिण्यासाठी व स्नानासाठी दिवसातुन कमीत कमी दोन वेळा पाणी पुरवठ्याच्या मक्तासाठी
सिलबंद निविदा 15 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 3 वाजेपावेतो (सुट्टीचे दिवस सोडून)
मागविण्यात आल्या आहेत. या निविदा तहसिल कार्यालय, चोपडा येथे पोहचतील अशा बेताने
टपालाने अगर समक्ष सादर कराव्यात. असे आवाहन अधिक्षक, दुय्यम कारागृह, चोपडा, जि.
जळगाव यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी अधिक्षक, दुय्यम
कारागृह, चोपडा यांचेशी 02586-222444 या क्रमांकावर संपर्क साधावा.
०००००
No comments:
Post a Comment