Friday, 11 January 2019

निवृत्ती वेतन धारकांनी 10 फेब्रुवारी पर्यंत बचतीचे कागदपत्रे सादर करावीत


         जळगाव, दि. 12:-   जळगाव जिल्हयातील कोषागारांतर्गत निवृत्तीवेतन,  कुटुंब निवृत्तीवेतन घेणा-या आयकर पात्र निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी आयकरात सुट मिळण्यासाठी केलेल्या बचतीची सर्व कागदपत्रे जळगाव कोषागारात दि. 10 फेब्रुवारी 2019 पर्यंत सादर करावी.  जेणे करुन आपल्या निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतनातून देय असलेल्या आयकरात कपात करणे किंवा आपण बचत केलेल्या रकमेतुन आयकर सुट देणे याबाबत कार्यवाही करणे सुलभ होईल, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्र. सि. पंडीत यांनी केले आहे.
000

No comments:

Post a Comment