Friday, 25 January 2019

पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील यांचा जिल्हा दौरा


       जळगाव, दि. 26 - राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन आणि सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
        रविवार, दि. 27 जानेवारी, 2019 रोजी रात्री 11 वा 30 मि. नी. मुंबई सीएसटीएम रेल्वे स्टेशन येथून  अमृतसर एक्सप्रेसने जळगावकडे प्रयाण. 
       सोमवार, दि. 28 जानेवारी, 2019 रोजी सकाळी 6 वा.13 मि.नी अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगावकडे प्रयाण. 
            सकाळी 8 वा 30 मि.नी अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय वाहनाने अहिंसा तिर्थ गोशाळा, कुंसुंबा, ता. जळगाव कडे प्रयाण. सकाळी 8 वा 45 मि.नी अहिंसा तिर्थ गोशाळा, कुंसुंबा, ता. जळगाव येथे आगमन व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या निवासी प्रशिक्षण प्रकल्पाचे भुमिपुजन समारंभास उपस्थिती. सकाळी 9.15 मि.नी अहिंसा तिर्थ गोशाळा, कुंसुंबा, ता. जळगाव येथून शासकीय वाहनाने वाघुर नदी, हिंगणे ता. जामनेर कडे प्रयाण. सकाळी 10 वाजता वाघूर नदी, हिंगणे बु. येथील नदीपात्रात आगमन व गाळपेरा क्षेत्रात लागवड केलेल्या चा-याची पाहणी. सकाळी 10.15 मि.नी हिंगणे बु. ता. जामनेर येथून शासकीय वाहनाने पाळधी ता. जामनेरकडे प्रयाण.
         सकाळी 10 वा 45 मि.नी पाळधी ता. जामनेर येथे आगमन व तात्पुरत्या नळ पाणी पुरवठा योजनेची पाहणी (माळपिंप्री ल.पा. तलावाखाली पाणीपुरवठा योजनेची विहीर) सकाळी 11 वाजता माळपिंप्री, ता. जामनेर येथून शासकीय वाहनाने नेरी-म्हसावद-एरंडोल मार्गे धरणगावकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता धरणगाव येथे आगमन व धरणगाव नगरपरिषद आयोजित नुतन प्रशासकीय इमारत, जलशुध्दीकरण प्रकल्प, नवीन जलकुंभ मार्केट कमिटी स्मशानभुमी, सोनवद रस्ता स्मशानभुमी या कामांचे लोकार्पण सोहळयास उपस्थिती. (स्थळ- नवीन प्रशासकीय इमारत नगरपरिषद, धरणगाव) दुपारी 1 वा 30 मि.नी धरणगाव येथून शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाकडे प्रयाण. दुपारी 2 वा 30 मि.नी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या खर्चाबाबत अधिका-यांच्या आढावा बैठकीस उपस्थित स्थळ- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव. दुपारी 4 वाचता टंचाई निवारण बैठकीस उपस्थिती. स्थळ- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव. सायं 5 वाजता पत्रकार परिषदेस उपस्थिती. स्थळ - नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव. सायं 5 वा 30 मि. नी महसूल अधिकारी यांचे बैठकीस उपस्थिती. स्थळ- रोटरी भवन, मायादेवी नगर, जळगाव. रात्री 9 वाजता सागर पार्क, जळगाव येथे आगमन व भरारी फाउंडेशन आयोजित महिला बचत गटांच्या बहिणाबाई महोत्सवाच्या सांगता समारोपास उपस्थिती. रात्री 9 वा 45 मि.नी अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. रात्री 10 वा. 45 मि.नी शासकीय वाहनाने जळगाव रेल्वे स्थानकाकडे प्रयाण. रात्री 11 वा 15 मि.नी जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व अमरावती एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण.
०००

No comments:

Post a Comment