जळगाव, दि. १ - राज्यातील पदवीधर अंशकालीन
उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्वावर नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्याचा
निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या वेब पोर्टलवर
असलेल्या एकूण ४०९ उमेदवारांच्या यादीच्या अनुषंगाने या सर्व उमेदवारांनी त्यांचे
सर्व मूळ प्रमाणपत्रे, अंशकालीन म्हणून तीन वर्षे पूर्ण काम केल्याचा तहसिलदार
यांनी दिलेला मूळ दाखला/ प्रमाणपत्र, आधार कार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, सर्व
प्रमाणपत्रांच्या छायाकिंत प्रती व अद्यावत पासपोर्ट फोटो इत्यादीसह खालीलप्रमाणे
तालुकानिहाय नमूद केलेल्या तारखांना उपस्थित रहावे.
जिल्ह्यातील पात्र एकूण ४०९ उमेदवारांनी तालुकानिहाय विहित
तारखेला कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, जळगाव या कार्यालयात कार्यालयीन
वेळेत उपस्थित रहावे. असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक संचालक, जिल्हा
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.
तालुक्याचे
नाव व कार्यालयात उपस्थित राहण्याचा दिनांक पुढील प्रमाणे :- जळगाव व भुसावळ- ३ जानेवारी रोजी, चाळीसगाव ४ जानेवारी रोजी, अमळनेर
व पारोळा ५ जानेवारी रोजी, पाचोरा व भडगाव
७ जानेवारी, एरंडोल व धरणगांव ८ जानेवारी, मुक्ताईनगर व बोदवड ९ जानेवारी, यावल व
रावेर १० जानेवारी, जामनेर व चोपडा
११ जानेवारी, २०१९ रोजी उपस्थित रहावे. असे श्रीमती तडवी, सहाय्यक संचालक,
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले
आहे.
000
No comments:
Post a Comment