जळगाव, दि. 22:- सेवाकार्याचा कुंभमेळा अर्थात हेल्प फेअर-2 मध्ये सामाजिक कार्य करण्याऱ्या संस्थाच्या माहिती सोबतच शासकीय योजनांचीही माहिती मिळणार असून मुख्य म्हणजे यातील काही योजनांचा तात्काळ लाभही नागरिकांना घेता येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.
लाईफ इज ब्युटीफुल फौऊंडेशन आयोजित हेल्प फेअर चे हे सलग दुसरे वर्ष आहे. दि. 2 ते 4 फेब्रुवारी, 2019 या कालावधीत शहरातील सागर पार्क येथे हा आगळा वेगळा उपक्रम संपन्न होणार आहे.
काय आहे हेल्प फेअर
हेल्प फेअर हा सेवाकार्याचा कुंभमेळा आहे. ज्याने समाजामध्ये नि:स्वार्थ भावनेने तन, मन, धन, अर्पण करुन समाजातील गरजवंतांसाठी काम करणात्या समाजसेवी संस्था व सेवादूत तसेच समाजातील दानशूर व संवेदनशील लोकांना एकत्र आणले आहे. आता या उपक्रमामध्ये शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचाही समावेश होत आहे.
या शासकीय योजनांची मिळेल माहिती
हेल्प फेअर-2 मध्ये जिल्ह्यातील सेवाभावी संस्था व सेवादूतांच्या माहितीसह शासकीय योजनांची माहिती व काही सेवांचा तात्काळ लाभ मिळणार आहे. त्यामध्ये आधार कार्ड, मतदार नोंदणी, शिकाऊ वाहन परवाना, संजय गांधी निराधार योजना, शहरी प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला गॅस योजना, जन्म, मृत्यू नोंदणी, लोकशाही पंधरवाडा, स्वच्छ भारत अभियान, विविध कृषी योजना, आरोग्य विभागाच्या विविध योजना, सामाजिक वनीकरण, लोकराज्य मासिक, महिला व बालविकास आदी योजनांची परिपूर्ण माहिती मिळेल. तर आधारकार्ड, मतदार नोंदणी, शिकाऊ वाहन परवाना या सारख्या सुविधांचा तात्काळ लाभ घेता येणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील समाजसेवी संस्था व सेवादूतांना मल्हार हेल्प फेअर-2 मध्ये सहभागी करुन घेण्यात आले असून आता शासकीय योजनांचीही माहिती नागरिकांना मिळणार असल्यामुळे सर्वासाठीच हेल्प फेअर अत्यंत उपयोगी ठरणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी व सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी केले आहे.
०००

No comments:
Post a Comment