Tuesday, 15 January 2019

बालगृहातील माजी अनाथ प्रवेशितांनी प्रस्ताव सादर करावे


          जळगाव, दि.15:-  महिला व बाल विकास विभाग अंतर्गत चालविण्यात येणा-या बालगृहातील अनाथ प्रवेशितांना अनाथ प्रमाणपत्र देणेबाबत शासन निर्णय दिनांक 6 जून 2016 अन्वये  तरतूद  करण्यात आली आहे.   अनाथ मुलांना शासकीय नोकरी, शिक्षण व इतर बाबीत 1% आरक्षण देणेबाबत तरतूद 2 एप्रिल 2018 च्या शासन निर्णयान्वये केलेली आहे.
            जळगाव जिल्हयातील बालगृहातून सुटलेल्या माजी अनाथ प्रवेशितांपैकी  वरील शासन निर्णयानुसार च्या अटी व शर्तीची पुर्तता करतात अशा माजी प्रवेशितांनी त्यांचा प्रस्ताव त्यांच्या वास्तव्याच्या कालावधीतील शेवटच्या बालगृहाकडे सादर करावा. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले  आहे. 
०००

No comments:

Post a Comment