Wednesday, 9 January 2019

महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत ऑन लाईन नोंदणी सुरु


        जळगाव, दिनांक 9 :- शासन निर्णय दिनांक 21 डिसेंबर 2018 अन्वये वस्त्रोद्योग धोरण 2018-2023 अंतर्गत वीजदर सवलतीस पात्र ठरणा-या वस्त्रोद्योग घटकांना संचालनालयाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी व आवेदन करावयाचे आहे. तरी सर्व संबधित वस्त्रोद्योग घटकांनी https://www.dirtexmah.gov.in या वेबसाईवर उपलब्ध करुन देण्यात असुन दिनांक 31 जानेवारी 2019 पर्यंत नोंदणी व वीजदर सवलतीकरीता आवेदन करावे. असे संचालक वस्त्रोद्योग, महाराष्ट्र शासन, नागपूर डॉ. माधवी खोडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        ०००

No comments:

Post a Comment