Wednesday, 23 January 2019

निवृत्तीवेतन /कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन


       जळगाव, दि. 23 - जिल्ह्यातील कोषागारार्तंगत निवृत्तीवेतन / कुटूंब निवृत्तीवेतन घेणा-या सर्व निवृत्तीवेतन /कुटूंब निवृत्तीवेतन धारकांना सातव्या वेतन आयोगानुसार त्यांच्या वयोमानानुसार वाढीव निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
            त्याकरिता ज्या निवृत्तीवेतन धारक / कुटूंब निवृत्तीवेतन धारकांचे वय 80 किंवा त्यापेक्षा जास्त वय असेल त्यांनी जन्म तारखेची पूर्ण नोंद असलेले आधार, पॅन, जन्माचा दाखला, पासपोर्ट, सेवा पुस्तकाची जन्म तारखेची नेांद असलेली प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, वाहनचालक परवान्याची प्रत कोषागारात सादर करावी. जेणेकरुन पुढील कार्यवाही कोषागारास करणे सुलभ होईल. असे आवाहन कोषागार अधिकारी श्री. प्र. सि. पंडीत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment