जळगाव, दि. 17 - राज्य शासनामार्फत लघु
उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील दोन लघु उद्योग घटकांसाठी
जिल्हा पुरस्कार योजना सुरु केलेली आहे. त्यानुसार सन 2018 च्या जिल्हा
पुरस्काराकरीता 21 जानेवारी, 2019 पर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याचे जिल्हा
उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील यांनी कळविले आहे.
या
पुरस्काराचे स्वरुप प्रथम पुरस्कार पंधरा हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ,
तर व्दितीय पुरस्कार दहा हजार रुपये रोख, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. सन 2018
चे जिल्हा पुरस्कारासाठी सुक्ष्म व लघु उपक्रम 1 जानेवारी, 2015 पुर्वी जिल्हा
उद्योग केंद्र, जळगाव कार्यालयाकडे स्थायी लघु उद्योग नोंदणी झालेला असावा. उद्योग
घटक मागील दोन वर्षापासून सलग उत्पादन करणारा असावा. यापुर्वी राष्ट्रीय/
आंतराष्ट्रीय व जिल्हा पुरस्कार मिळालेले घटक या पुरस्कारास पात्र होणार नाहीत.
उद्योग घटक वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
जिल्हा पुरस्कारासाठीचे
सर्वसाधारणपणे गुणांकन याप्रमाणे राहील. उद्योग घटकाची स्थिर मत्ता, उत्पादन व
कामगार यांचेमधील वाढ, तंत्रज्ञान कौशल्य, उद्योजकाची पार्श्वभुमी, उद्योगासाठी
निवडलेली जागा, उत्पादनात केलेला विकास व गुणवत्ता, आयात-निर्यात, नविन
उत्पादनासाठी धडपड, घटकाचे व्यवस्थापन व अकॉन्टीग सिस्टीम, मशिनरीची सर्वसाधारण
स्थिती, इमारत व यंत्रसामुग्रीची देखभाल,कामागारांसाठी कल्याणकारी योजना, अनु.
जाती/जमाती चे उद्योजकास 10 टक्के तसेच महिला उद्योजक 5 टक्के अधिक गुणास पात्र
ठरतील.
या पुरस्काराकरीता विहीत
नमुन्यातील अर्ज महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद कार्यालयात कार्यालयीन वेळेत
उपलब्ध होईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लघु उद्योग उपक्रमधारकांनी जिल्हा
पुरस्कारासाठी अर्ज करावेत. असे आवाहन श्री. पाटील, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग
केंद्र, जळगाव यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment