Friday, 11 January 2019

प्रजासत्ताक दिनी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तंबाखू मुक्तीची शपथ घ्यावी


            जळगाव, दि. 12 :- लोकांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण कमी होण्यासाठी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे.  यासाठी तंबाखू मुक्त शपथ हे प्रभावी माध्यम आहे. जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, संस्था, सार्वजनिक ठिकाणे आणि व्यक्ती तंबाखूमुक्त व्हावे यासाठी सर्व कार्यालयात दिनांक 26 जानेवारी 2019 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमानंतर कार्यलय प्रमुखांनी सर्वांना तंबाखूमुक्तीची शपथ दयावी. याव्यतिरिक्त आयोजित कार्यक्रमात संस्था/ कार्यालय प्रमुख यांनी आपल्या भाषणात तंबाखूच्या दुष्परिणामाबाबतच्या   माहितीचा समावेश करावा असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा तंबाखू नियंत्रण  समितीचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

No comments:

Post a Comment