जळगाव, दि. 21 - दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी
किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला.
या लोकशाही दिनात चार तक्रार अर्ज प्राप्त
झाले. यामध्ये तीन अर्ज जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी
संबंधित तर एक अर्ज सहाय्यक नगर रचनाकार, महानगरपालिका यांचे कार्यालयाशी संबंधित
आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला वरीष्ठ
पोलिस अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सदस्य सचिव जिल्हा महिला व बाल
विकास अधिकारी यांचे प्रतिनिधी व संरक्षण अधिकारी हे उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षांनी महिला लोकशाही
दिनातील प्रलंबीत अर्ज व निकाली अर्जांचा आढावा घेऊन तक्रार अर्ज लवकरात लवकर
निकाली काढण्याच्या सुचना दिल्यात. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव
यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment