Wednesday, 9 January 2019

हज यात्रेस जाऊ ईच्छिणाऱ्या मुस्लीम अधिकार व कर्मचाऱ्यांनी कार्यालय प्रमुखांमार्फत १४ जानेवारी पर्यंत ना-हरकत सादर करावेत


      जळगाव, दिनांक 9, (जिमाका) :- हज 2019 करिता राज्य शासनातर्फे पाठवावयाच्या खादिमुल हुज्जाज यांची निवड महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत करावयाची आहे. याकरिता राज्य शासनाच्या सर्व विभागांतर्गत कार्यरत असलेल्या पात्र व इच्छूक मुस्लिम स्त्री व पुरुष उमेदवारांना ( वर्ग 1 व त्यावरील अधिकारी वगळून सर्व अधिकारी व कर्मचारी) त्यांच्या कार्यालय प्रमुखांमार्फत योग्य मार्गाने ना-हरकत प्रमाणपत्रासह विहित नमुन्यातील (परिशिष्ट) अर्ज सादर करावे.
         अर्ज www.hajcommittee.gov.in  या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहे. ऑनलाईन पद्धतीने पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह महाराष्ट्र राज्य हज समितीच्या उपरोल्लेखित कार्यालयात दि. 14 जानेवारी,2019 पर्यंत निश्चितपणे पोहचतील अशा बेताने पाठविण्याकरिता सर्व विभागांना आपल्या मार्फत पाठविण्यात यावे. तसेच सदर पत्र (सहपत्रासह) अल्पसंख्यांक विकास विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.
            खादिमुल हुज्जाज म्हणून सेवा पार पाडण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी व शर्तीच्या अधिन राहून उमेदवाराची शिफारस महाराष्ट्र राज्य हज समितीकडे करण्यात यावी.
            त्या उमेदवारांकडे दि. 31 जानेवारी 2020 पर्यंत वैधता असलेले पारपत्र आवश्यक राहील. पुरुष / स्त्री अर्जदार ज्यांचे दि. 1 जुलै 2019 रोजी वय 25- 58 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. अशा अधिकारी / कर्मचा-यांना केंद्रीय हज समिती / महाराष्ट्र राज्य हज समितीमार्फत त्या प्रित्यार्थ आयोजित केले जाणा-या प्रशिक्षणास उपस्थित राहणे अनिवार्य  राहील. त्या उमेदवाराने यापूर्वी हज किंवा उमरा केलेले असावे. हज केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. अरबी भाषेचे ज्ञान असणा-यांना प्राधान्य देण्यात येईल. उमेदवाराचे आरोग्य उत्तम असावे. उमेदवाराने शासकीय दवाखान्यातूनच मिळावलेले वैद्यकीय प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल. उमेदवारा हदय रोगी, उच्च रक्तदाब मधुमेह, अस्थमा, क्षयरोगी आणि किडणी विकार ग्रस्त मुक्त असावेत. तसेच त्यांना सार्वजनिक कार्यक्रम व्यवस्थापनाचा अनुभव असावा. खादिमुल हुज्जाज म्हणून निवड होण्याकरिता कोणताही राजकीय दबाब आणण्यात येवू नये. तसे आढळून आल्यस त्या उमेदवाराची निवड प्रक्रिया थांबविण्यात येईल. उमेदवाराची निवड प्रक्रिया राबविताना त्यांचे शिक्षण व संगणकीय ज्ञानाचा विचार करुन प्राधान्य देण्यात येईल.  उमेदवाराने त्यांच्य कार्यालय प्रमुखाचे नाहरकत प्रमाणपत्र व इतर मुळ आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
            असे कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य हज समिती मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                        ०००

No comments:

Post a Comment