जळगाव,
दि. १५ -
जिल्ह्यासाठी प्राधान्य कुटूंब योजनेच्या २२ लाख ६३ हजार ५५ सदस्य आहेत. या
सदस्यांना प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेतंर्गत फेब्रुवारी २०१९ या महिन्यासाठी
गहू, ज्वारी आणि तादूळ या धान्याचा साठा उपलब्ध झाला आहे.
या योजनेअंतर्गत गहू ४५ हजार २६० क्विंटल, प्रति एक रुपये दराने, ज्वारी २२ हजार
६३० क्विंटल प्रति एक रुपया किलो दराने
असे एकूण ६७ हजार ८९० क्विंटल व तांदूळ ४५ हजार २६० क्विंटल प्रति तीन रुपये
किलो दराने उपलब्ध आहे.
पात्र लाभार्थी कार्डधारकांनी आपल्या
जवळच्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेऊन जावे.
असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर
यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment