Friday, 18 January 2019

राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रमांतर्गत आयोजित कुष्ठरोग निवारण पंधरवाड्यात सर्वांनी सहभाग नोदवावा- सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग


              

        जळगाव, दि. 18 :- राष्ट्रीय कृष्ठरोग कार्यक्रमांतर्गत  पंतप्रधान प्रगती योजनेंतर्गत  30 जानेवारी, 2019 रोजी घेण्यात येणाऱ्या जिल्हातील सर्व ग्रामपंचायतींमधील ग्रामसभांमध्ये स्पर्श कृष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. सदर ग्रामसभेत आरोग्य कर्मचारी ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित राहुन जिल्हाधिकारी महोदयांच्या घोषणापत्राचे वाचन करतील. संरपंचांचे भाषण, कुष्ठरोग जनजागृती कार्यक्रम, कुष्ठरोगाविषयी प्रश्न उत्तरे आणि अभार प्रदर्शन असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2019 दरम्यान  कुष्ठरोग निवारण पंधरवाडा साजरा करण्याबाबत जनजागृती करण्यात येईल.
          स्पर्श जनजागृती अभियान यशस्वीपणे राबविण्याबाबत जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी  किशोर राजे निंबाळकर, यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 17 जानेवारी 2019 रोजी घेण्यात आली. सदर सभेत     जिल्हाधिकारी किशार राजे निंबाळकर यांनी अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी मार्गदर्शन तथा सूचना दिल्यात. सदर सभेस समन्वय समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच तालुका स्तरावर तालुका समन्वय समिती सभा, तालुकास्तर कार्यशाळा, प्राथमिक आरोग्यक केंद्रस्तर कार्यशाळा जानेवारी  महिन्याच्या  तिस-या आठवड्याच्या  आत घेण्यात येणार आहे.  सदर अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी  सर्व संबंधितांनी मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन  जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण,, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापुरकर,  सहाय्यक संचालक,आरोग्य सेवा कुष्ठ रोग, डॉ. शांताराम ठाकुर, यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment