Tuesday, 15 January 2019

व्यवसायकर विशेष नोंदणी अभियान 14 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान


           जळगाव, दि.15:- जिल्हयात 14 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2019 या कालावधीत व्यवसायकर विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.
            महाराष्ट्र व्यवसायकर कायदा 1975 अन्वये नावनोंदणीकृत / नोंदणीकृत नसलेल्या व्यक्ती/मालक यांना व्यवसायकर नोंदणी प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी व्यवसायकर विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून विशेष नोंदणी अभियान 14 जोनवारी ते 8 फेब्रुवारी 2019 या कालावधीत राबविण्यात येत आहे. तरी व्यवसायकर कायद्यांतर्गत नावनोंदणीकृत / नोंदणीकृत  नसलेल्या व्यक्तींनी, मालकांनी व्यवसायकराची नोंदणी करणे आवश्यक आहे. याकरिता शासन आपल्या दारी या उपक्रमानुसार, व्यवसायकर अधिकारी आपल्या व्यवसायकरांच्या ठिकाणी अथवा परिसराला भेट देणार आहेत. अनोंदीत असल्यास जागेवर नोंदणी करुन घेता येईल . तसेच नोंदणीकरीता बाजारपेठा, मॉल, व्यवसाय केंद्रे, औद्योगिक वसाहत या ठिकाणी नोंदणी शिबीर घेण्यात येणार आहेत.
           त्याबाबतचे ठिकाण, दिनांक www.mahagst.gov.in <http:// www.mahagst.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. याबरोबरच वस्तू व सेवा कर भवन, रसिक मार्ग, गणपती नगर, जळगाव येथे मदतकक्ष उपलब्ध करण्यात येणार आहे. तरी अनोंदीत नांव नोदणी करदात्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्यकर सहआयुक्त उदय बी. संकपाळ, व्यवसायकर नाशिक क्षेत्र नाशिक व जिल्हा व्यवसायकर अधिकारी आर. बी. बावस्कर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्व्ये कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment