जळगाव, दि.18- राज्य विधानसभेचे अध्यक्ष
ना. हरिभाऊ बागडे हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
शनिवार
दि. 19 जानेवारी, 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता मोटारने उस्मानपुरा, औरंगाबाद येथून
अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. आगमन व राखीव (स्थळ:-
अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव), सकाळी 11.50 वा. मोटारने अजिंठा शासकीय विश्रामगृह,
जळगाव येथून छत्रपती संभाजीराजे नाटयमंदिर, महाबळ रोड, जळगावकडे प्रयाण. दुपारी 12.00
वा. आगमन व बारी युवा प्रकोष्ठ महाराष्ट्र आयोजित आम्ही बारी सन्मान सोहळा या
कार्यक्रमात उपस्थिती. (स्थळ :- छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदीर, महाबळ रोड, जळगाव),
दुपारी 1.00 वा. मोटारने छत्रपती संभाजी नाट्यमंदीर, महाबळ रोड, जि.जळगाव येथून
अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. दुपारी 1.10 वा. आगमन व राखीव. (स्थळ:-
अजिंठा शासकीय विश्रामगृह,जळगाव) सोईनुसार मोटारने अजिंठा शासकीय विश्रामगृह,
जळगाव येथून उस्मानपुरा, औरंगाबादकडे प्रयाण.
०००००
No comments:
Post a Comment