जळगाव, दि. 16- बहुराज्यीय सहकारी संस्था, अधिनियम 2002 चे कलम 84 (4) अन्वये सन 2019-2022 या कालावधीसाठी संघटनात्माक व कायदेशीर आणि आर्थिक व लेखाविषयक बाबींविषयी प्रारुप लवाद नामतालिका सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, यांचे sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे mahasahakar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 15 जानेवारी 2019 रोजी प्रसिध्द केली आहे.
त्याचप्रमाणे लवाद नामतालिकेसाठी अपात्र अर्जदारांची यादीही या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेली आहे. प्रारुप नामतालिकेवर दि. 31 जानेवारी, 2019 पर्यंत सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयातील कायदा व वैधानिक कार्यवाही कक्षामध्ये हरकती दाखल करता येणार आहे. मुदतीत प्राप्त हरकतींवर दि. 18 फेब्रुवारी, 2019 पर्यंत निर्णय घेवून दि. 28 फेब्रुवारी, 2019 रोजी अंतिम लवाद नामतालिका प्रसिध्द केली जाणार आहे. असे मेघराज राठोड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:
Post a Comment