Tuesday, 22 January 2019

भुसावळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतदार जनजागृती मंचची स्थापना

        जळगाव, दि. 22 - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ या संस्थेत नुकतीच मतदार जनजागृती मंचची स्थापना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी, जळगाव यांचे आदेशानुसार करण्यात आलेली आहे. या मंचचे अध्यक्ष म्हणून श्री. एम. बी. गवई असून नोडल अधिकारी म्हणून श्री. एम. पी. सुर्यवंशी व श्री. एफ. वाय. तडवी, श्री. एन. एस. तडवी यांची कार्यकारिणी सचिव तर संस्थेतील सर्व कर्मचारी यांची सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
         या मतदार जनजागृती मंच अंतर्गत संस्थेत चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, लेखीपरीक्षा, पथनाट्याचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच 25 जानेवारी, 2019 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस असल्याने सामुहिक शपथ तीन भाषेत दिली जाणार आहे. असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भुसावळ यानी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                    ०००

No comments:

Post a Comment