Wednesday, 23 January 2019

सैनिकी मुलींचे वसतिगृह कलीना येथे तात्पुरत्या स्वरुपात पदभरती 28 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


जळगाव, दि. 23 - सैनिकी मुलींचे वसतिगृह कलीना, सांताक्रुझ (पुर्व) मुंबई येथे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने वसतिगृह अधिक्षीका एक पद भरण्यात येणार आहे.
            अर्जदार ही युध्द विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यु पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक/आजी सैनिक यांची पत्नी असावी. (युध्द विधवेस/विधवेस प्राधन्य).अर्जदाराचे शिक्षण  एस एस सी पास असावे. एसएससी, आयटीआय पास व टायपींग प्रमाणपत्र धारण करणा-यास प्राधान्य दिले जाईल. वयोमर्यादा 30 ते 50 वर्षे या दरम्यान असावे. मानधन रुपये 17 हजार 823 इतके राहिल. अर्ज पोहोचण्याची अंतीम तारीख 28 जानेवारी, 2019 असून मुलाखतीची तारीख 30 जानेवारी 2019 आहे.                  
पत्रव्यवहाराचा पत्ता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर, 9 वा माळा, प्रशासकीय इमारत, शासकीय वसाहत, बांद्रा पुर्व, मुंबई - 400051 असा असून  दूरध्वनी 022-26552172 हा आहे.
तरी जिल्ह्यातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी सदर पदासाठी अर्ज करावे. असे आवाहन ले. कमांडर मिनल मधु पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. 
०००

No comments:

Post a Comment