Thursday, 3 January 2019

महिला व बाल विकास कार्यालयात बालिका दिन साजरा


जळगाव, दि. 03 - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 3 जानेवारी रोजी बालिका दिन साजरा करण्यात येतो. या बालिका दिनाचे औचित्य साधुन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
            जिल्हा महिला व बाल विकास अधिकरी श्री. रमेश बा. काटकर यांनी उपस्थितांसोबत बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेवर आधारीत प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमास जिल्हा परिविक्षा अधिकारी श्री. संजय पाटील, परिविक्षा अधिकारी श्रीमती सारीका मेतकर, विधी सल्लागार श्रीमती संध्या वानखडे, संरक्षण अधिकारी श्रीमती आरती साळूंके, अचर्ना झोडगे, यशश्री पाटील, संजय चव्हाण, प्रल्हाद पाटील, नितीन डांगळे आदि कर्मचारी उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment