जळगाव, दि. 21 - अपंग व्यक्ती अधिनियम 2016 हा कायदा दि.19 एप्रिल, 2017 रोजी
सर्व देशभर लागू झाला आहे. या कायद्यातील कलम 39 (1) नुसार मा. आयुक्त, अपंग
कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आदेश दिले आहे की, एक दिव्यांग
व्यक्ती व एक दिव्यांग व्यक्ती करीता कार्य करणारी संस्था यांचेकरीता जिल्हास्तरीय
दिव्यांग व्यक्ती प्रेरणा पुरस्कार 2019 देण्यात येणार आहे.
या
पुरस्कारासाठी व्यक्तीची निवड करणेसाठी दिव्यांग व्यक्तींची निवड करतांना
यु.पी.एस.सी, एम.पी.एस.सी, परदेशी शिष्यवृत्ती, आय.टी.आय. व इतर नामांकीत शैक्षणिक
संस्थांमध्ये प्रवेश मिळालेली दिव्यांग व्यक्ती व इतर गुणवत्ताधारक दिव्यांग व्यक्ती
पात्र असणार आहे.
दिव्यांग
व्यक्तींकरीता कार्य करणा-या संस्थेसाठी दिव्यांग व्यक्तींचे सर्वांगीण पुनर्वसन केलेल्या
संस्था ज्यांचे कार्य दिव्यांग व्यक्तींना रोजगार व स्वयंरोजगार देणे, त्यांचे
विवाह आयोजीत करणे, लघुउद्योगासाठी कर्ज उपलब्ध करुन देणे, त्यांना शैक्षणिक मदत
करणे, दिव्यांग सहायक साधने व उपकरणे पुरविणे, कृत्रिम अवयव व साधने पुरविणे तसेच
दिव्यांग विद्यार्थ्याकरीता संगणक प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा व वसतीगृहाची सोय
करणे अशा संस्था पात्र असणार आहे.
या पुरस्कार पात्र व्यक्ती व संस्थाना रक्कम
रुपये दहा हजार रोख रक्क्मेसोबत प्रमाणपत्र व शाल, श्रीफळ देवून सन्मान करण्यात
येईल.
यासाठीचे
प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव कार्यालयास 23
जानेवारी, 2019 पर्यत दुपारी 3.00 वाजेपर्यत सादर करावेत. असे आवाहन जिल्हा समाज
कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment