Monday, 21 January 2019

बालिका सप्ताहाचे उद्घाटन संपन्न


         जळगाव, दि. 21 -  जिल्ह्यात बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेतंर्गत 21 ते 26 जानेवारी 2019 या कालावधीत बालिका सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या बालिका सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत.
            बालिका सप्ताहाचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बी. एस. पाटील यांचे हस्ते करण्यात आले. बालिका सप्ताहाच्या उदघाटन प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. ठोंबरे यांनी उपस्थितांना बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या प्रतिज्ञेची शपथ दिली. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात करण्यात आली. सदरचा स्वाक्षरी फलक बहिणाबाई महोत्सवातही ठेवण्यात येणार आहे. जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
          बालिका सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव, जिल्हा परिविक्षा अधिकारी, परिविक्षा अधिकारी, संरक्षण अधिकारी, मुख्य सेविका व अंगणवाडी सेविका आदि उपस्थित होते.
०००

No comments:

Post a Comment