Wednesday, 16 January 2019

पाचोरा पंचायत समितीची 21 जानेवारी रोजी आमसभा

           जळगाव, दि. 16 - पाचोरा पंचायत समितीची सन 2015-16, 2016-17, 2017-18 व 2018-19 या वर्षांची आमसभा पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर धनसिंग पाटील यांचे अध्यक्षतेखाली व सहअध्यक्ष ना. गिरीष दत्तात्रय महाजन, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे उपस्थितीत सोमवार, दिनांक 21 जानेवारी, 2019 रोजी दुपारी 1.00 वाजता राजीव गांधी टाउन हॉल  पाचोरा, जि. जळगाव येथे होणार आहे.
     या आमसभेत पाचोरा तालुका कार्यक्षेत्रातील विविध विभागातंर्गत झालेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात येणार असून पुढील वर्षात करावयाच्या कामकाजाची रुपरेषा ठरविण्यात येणार आहे.  तर तालुक्यातील नागरीकांनी या आमसभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गणेश चौधरी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पाचोरा यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                      000

No comments:

Post a Comment