Wednesday, 16 January 2019

‘खेलो इंडिया’ उपक्रमांवर आधारीत ‘लोकराज्य’ मासिकाचा विशेषांक प्रकाशित

         जळगाव, दि. 16 - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दरमहा लोकराज्य मासिक प्रकाशित करण्यात येते.  माहे जानेवारी, 2019 या महिन्याचा अंक हा खेलो इंडिया या उपक्रमावर आधारीत विशेषांक प्रकाशित करण्यात आला आहे. या महिन्याच्या लोकराज्य मासिकाचे अतिथी संपादक हे राज्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्यांक विकास व वक्फ मंत्री विनोद तावडे हे असून त्यांचा मैदानाशी नाते जोडू या ! हा विशेष लेख या अंकात आहे.
        तसेच राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र  फडणवीस यांनी समृध्द क्रीडा संस्कृतीसाठी… या लेखातून खेलो इंडिया या उपक्रमाची माहिती सांगितली आहे. तर सचिन तेंडुलकर यांचा विचार बदला, यश मिळवा.. युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांचे चॅम्पियन घडविण्यासाठी ‘खेलो इंडिया’  हे विषयावरील वैशिष्टयपूर्ण लेख आहेत.
          तसेच ध्यास सर्वोत्तमाचा, खेळाला मिळाली प्रतिष्ठा, पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक, महाराष्ट्राची दैदीप्यमान कामगिरी, खेळू द्या मुलांना, अष्टपैलू व अष्टावधानी, मोही एक्सप्रेस, महाराष्ट्र केसरी ते पोलीस अधिकारी, विदर्भातील क्रीडाचैतन्य, तांबड्या मातीची गौरवशाली परंपरा, खेळायलाच पाहिजे, आपले क्रीडावैभव, महाराष्ट्र खेळला-महाराष्ट्र जिंकला, खेळाडूंसाठी योजना, केंद्राच्या योजना, संधी साधा हे  विशेष लेखही या अंकात आहेत. याशिवाय 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनानिमित्त विशेष सदरात आव्हान आणि सामर्थ्य, 73 वे संमेलन, काव्यात्मजा, साहित्य संवर्धनाची दिशा साहित्य संमेलन हे लेख आहेत.
अशा अनेक विषयांची परिपूर्ण माहिती असलेल्या या अंकाची किंमत फक्त रुपये 10/- आहे. लोकराज्य मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त रुपये 100/- आहे. हा अंक जिल्ह्यातील प्रमुख स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या अंकाचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा. लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार वर्गणीदार होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव व उप माहिती कार्यालय, स्टेट बँक इमारत, भडगाव रोड, चाळीसगाव, येथे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.
                                                                 000

No comments:

Post a Comment