Thursday, 17 January 2019

महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

            जळगाव, दि. 17 - महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता ना. धनंजय मुंडे हे जिल्हा दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
                 शुक्रवार, दिनांक 18 जानेवारी, 2019 रोजी सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह, मनमाड, जि. नाशिक येथून मोटारीने चाळीसगाव, जि. जळगावकडे रवाना. सकाळी 11 वाजता बलराम व्यायाम शाळेचे मैदान, चाळीसगाव येथे आगमन व राष्ट्रवादी कॉग्रेस आयोजित परीवर्तन संकल्प यात्रा कार्यक्रम उपस्थिती. त्यानंतर चाळीसगाव, येथून मोटारीने पारोळा, जि. जळगावकडे रवाना. दुपारी 2 वाजता किसान महाविद्यालय मैदान, पारोळा येथे आगमन व राष्ट्रवादी कॉग्रेस आयोजित परीवर्तन संकल्प यात्रा कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर पारोळा येथून मोटारीने जळगावकडे रवाना. सायं 5 वाजता मणियार ग्राउंड, रिंगरोड, जळगाव येथे आगमन व राष्ट्रवादी कॉग्रेस आयोजित परीवर्तन संकल्प यात्रा कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व मुक्काम. 
                                                                             ०००

No comments:

Post a Comment