जळगाव, दि. 3 - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 188 वी जयंती आज
जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण
करुन अभिवादन केले.
याप्रसंगी
अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, उपजिल्हाधिकारी
(महसूल) रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद भामरे, उपजिल्हाधिकारी
(रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश शिंदे यांचेसह
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment