Friday, 26 October 2018

नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया सुरु अर्ज करण्याचे आवाहन


         जळगाव, दि.26:- जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परिक्षा 2019 साठी ऑनलाईन पध्‍दतीने वर्ग 9 वी साठी अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 15 ऑक्टोबर 2018 पासून सुरु झालेली आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने वर्ग 6 वी साठी अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 23 ऑक्टोबर 2018 पासून सुरु झालेली आहे. ही प्रक्रिया दिनांक 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत सुरु राहणार आहे. हया संबधीची सर्व माहिती पुढे दिलेल्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.  www.navodaya.gov.in / www.jnvjalgaonms.in आणि nvhsq.org  या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. असे प्राचार्य जवाहर नवोदय विदयालय, खंडारे साकेगाव , भुसावळ डॉ. आर आर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment