जळगाव, दि. 12 - शासनाचे गृहविभाग, मंत्रालय मुंबई यांनी त्यांचेकडील पत्र क्र. ईएआर 0313/सी-9/ पोल-9 दि. 28 सप्टेंबर 2018 च्या अधिसूचनेव्दारे शस्त्र नियम,2016 मधील नियम 15 मध्ये सुधारणा करण्यात आलेली असून दि. 31 मार्च, 2016 पर्यतच्या शस्त्र धारकांना युआयएन क्रमांक प्राप्त करुन घेण्याची मुदत दि. 31 मार्च, 2019 पर्यत वाढविण्यात आलेली आहे. अशी माहिती जिल्हा दंडाधिकारी यांनी कळविले आहे.
शस्त्र नियम 2016 मधील नियम 15, उप नियम (2) नुसार प्रत्येक परवाना प्राधिकारी व नुतनीकरण प्राधिकारी हे शस्त्र परवानाधारकांची माहिती NDAL-ALIS प्रणालीत भरुन त्यांना UIN क्रमांक प्राप्त करुन देतील. त्याप्रमाणे जर शस्त्र परवानाधारकाने दि. 31 मार्च, 2019 पर्यत UIN क्रमांक प्राप्त करुन घेतला नाही तर त्यांचा शस्त्र परवाना दि. 1 एप्रिल, 2019 नंतर अवैध समजण्यात येईल. अशी तरतुद भारत सरकारने त्यांच्या दि. 12 जुलै, 2018 च्या अधिसूचनेमध्ये केली आहे.
त्यानुसार दिनांक 31 मार्च, 2016 पर्यतच्या शस्त्रधारकांना UIN क्रमांक प्राप्त करुन घेण्याची मुदत दि. 31 मार्च, 2019 पर्यत वाढविण्यात आलेली आहे. तसेच दि. 31 मार्च 2018 नंतर UIN क्र. नसलेले सर्व शस्त्र परवाने रद्द होतील व सदर शस्त्र परवान्यावर नोंद असलेली शस्त्र बेकायदा समजून सरकार जमा केली जातील यांची सर्व शस्त्रपरवाना धारकांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा दंडाधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:
Post a Comment