Friday, 19 October 2018

ई – गृहप्रवेश प्रधानमंत्री आवास योजना





             जळगाव, दि. 19– प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रधानमंत्री आवास योजनेचे ई – गृहप्रवेश या योजनेतील लाभार्थीशी आज संवाद व्हिडीओ कॉन्फरन्स  व्दारे साधला.
        जळगाव येथे जिल्हाधिकारी सभागृहात एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील श्री. हरिष मराठे व श्रीमती शाईन जब्बार पटेल यांनी  प्रधानमंत्री श्री. नरेन्द्र मोदी यांच्याशी  व्हिडीओ कॉन्फरन्स  व्दारे संवाद साधुन घरकुल कसे मिळाले याबाबत माहीती दिली.
       महाराष्ट्र राज्यात 2,44,444 एवढे घरकुलाचा ई प्रवेश लाभार्थीनी केला, जळगाव जिल्हयात प्रधानमंत्री आवास योजनेत एकूण 14064 घरांचा ई – प्रवेश झाला. या Video Conference  ला जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिवाजी दिवेकर, जिल्हा सुचना विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रमोद बोरोले, जळगाव,           प्रकल्प संचालक श्री. सुनिल गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे, गट विकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे पवार सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. शिरसाठ, श्री. सोनवणे उपस्थित होते, असे प्रकल्प संचालक  सुनिल गायकवाड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment