जळगाव, दि.6:- डॉ. झाकीर हुसेन मदरसा
आधुनिकीकरण योजना सन 2018-19 ज्या मदरसांमध्ये पारंपारिक धार्मिक शिक्षण देण्यात
येते आणि पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिदी,
मराठी, इंग्रजी, व उर्दु या विषयाचे शिक्षण देण्यात येत असलेल्या आणि ज्यांना
आधुनिक शिक्षणाकरिता पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या
मदरशांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर मदरसा/मदरसे चालविणा-या संस्था धर्मदाय
आयुक्त अथवा महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. जळगाव
जिल्हयातील फक्त निवासी इच्छुक मदरसांनी शासन निर्णय क्र. अविवि-2010/ प्र.क्र.152/10/का-6/दि.11
ऑक्टोबर 2013 च्या तरतूदीनुसार विहित नमुन्यात अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हाधिकारी
कार्यालय, जळगाव येथे दिनांक 30 ऑक्टोबर 2018 पर्यंत सादर करावे विहित मुदतीनंतर
प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.
शासन निर्णय क्र.अविवि-2010/ प्र.क्र. 152/
10/का-6/दि. 11 ऑक्टोबर , 2013 अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी
www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे. असे सदस्य सचिव, उच्च स्तरीय निवडसमिती, तथा जिल्हा नियोजन अधिकारी,
जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment