जिल्हयात एकूण 237 गृह निर्माण
सहकारी संस्था असून संबंधितांनी या संस्थांच्या अध्याक्षांशी
संपर्क साधून त्यासंस्थामधील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत समाविष्ठ करणेसाठी
विशेष प्रयत्न करावे तसेच ज्या व्यक्तीचे
वय 1 जानेवारी 2019 रोजी 18 वर्षे पूर्ण होत आहे अशा व्यक्तींकडून 6नंबर फॉर्म
भरून घेणे तसेच ऑनलाइन मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध असल्याने तरुण वर्ग
संगणकाद्वारेही आपले नावाची नोंद करू शकतात. यासाठी पुरावा म्हणून वयाचा दाखला, रहिवासी
दाखला आणि पासपोर्ट साईज छायाचित्र अपलोड केल्यास मतदार नोंदणी होऊ शकते.
जिल्ह्यात 32 लाख 93 हजार 157 मतदार आहेत. मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत 37 हजार
नवीन पात्र मतदारांची नोंद आतापर्यंत करण्यात आली असून 20 हजार मतदार नोंदणी
प्रक्रियेत आहेत. अशी एकूण सुमारे 60 हजार नवीन मतदार नोंदणी झाली आहे. हे काम
एकूण टक्केवारीच्या पन्नास टक्के आहे. दिव्यांग मतदारांना अतिविशेष व्यक्तींचा
दर्जा देण्यात
आला असून एकूण
एकतीस हजार दिव्यांग मतदारांची नोंद झाली
आहे .दिव्यांग मतदारांना मतदानासाठी
विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने मतदारांना
त्यांच्या घरापासून मतदान केंद्रापर्यंत
नेण्यासाठी वाहन समावेश आहे. मतदार नोंदणी प्रक्रियेत स्त्रियांचे मतदार नोंदणी
प्रमाण पुरुषांच्या प्रमाणास व्यस्त असून दर हजारी 908 असे आहे. स्त्रियांच्या मतदार नोंदणीकडे अधिक लक्ष देणे
आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर पुढे
म्हणाले की, भावी मतदाराला निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी करण्यासाठी मतदान
प्रक्रियेची माहिती देणे, त्याला आपल्या मताचे मूल्य समजावून सांगणे, मतदान
करण्यास प्रवृत्त करणे आदी गोष्टी महाविद्यालय,माध्यमिक शाळा स्तरावर प्राचार्य,मुख्याध्यापक, शिक्षकांनी
प्रयत्न करावयाचे आहेत. 30 ऑक्टोंबरला
ह्या मोहीमेची सांगता होण्यापूर्वी आपआपल्या कार्यक्षेत्रात निर्धारित कामे शीघ्र गतीने
पूर्ण करायची आहेत. जगात सर्वात मोठी तरुणांची लोकसंख्या असलेला भारत , देशातील
तरुण मतदान प्रक्रियेत मागे राहिल्यास सुदृढ लोकशाहीसाठी हे घातक ठरू शकेल. तरी अधिकाधिक तरुणांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी
उद्युक्त करावे असेही त्यांनी शेवटी सांगितले.
उपजिल्हा
निवडणूक अधिकारी श्री प्रमोद भामरे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हास्तरीय
स्वीप सुकाणू समिती ,सुलभ निवडणुका जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती व जिल्हा निवडणूक
साक्षरता क्लब या तिन्ही समितींच्या रचनेची व कार्याची माहिती दिली . प्रारंभी
निवडणूक तहसीलदार सुरेश थोरात यांनी प्रास्ताविक केले व शेवटी
उपस्थितांचे आभार व्यक्त केले केले.
00000
No comments:
Post a Comment