जळगाव दि. 10 :- देशाच्या
दिव्यांग व्यक्तींच्या अधिकाराबाबत केंद्र शासनाच्या वतीने “दिव्यांग व्यक्तीचे अधिकार’’
अधिनियम 2016 हा कायदा पारीत करण्यात आला आहे. नवीन कायद्यानुसार सुधारीत व नविन
बाबींचा अधिकाधीक लाभ समाजातील दिव्यांग व्यक्तींना मिळवून देण्याच्या हेतूने
जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा, जळगाव व
केंद्र शासनाच्या समेकीत क्षेत्रीय केंद्र,
CRC नागपूर यांच्य संयुक्त विद्यमाने 12 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या
कालावधीत जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे एक दिवसीय
कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यशाळेमध्ये “दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016” या
नवीन कायद्याबाबत जनजागतृती करण्यात येणार आहे. त्यासाठी समेकीत क्षेत्रीय केंद्र,
नागपूर येथील संचालक गुरबक्ष चंद जगोटा,
संजय पुसम, पुनर्वस्न अधिकारी, नंदकुमार फुले, केंद्र संचालक डीडीआरसी पुणे, अजय
काकडे, राज्य समन्वयक, डॉ. प्रफुल्ल शिंदे, सहा. प्राध्यापक नागपूर उपस्थित राहून
जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींच्या
पुनर्वसनार्थ कार्य करणा-या अशासकीय संस्थाचे प्रतिनिधी, दिव्यांग शाळांचे
मुख्याध्यापक, शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना विविध विषयावर
मार्गदर्शन करणार आहेत.
नवीन कायद्याचा प्रचार – प्रसार व कायद्याची
ओळख होण्याच्या दृष्टीने जिल्हयातील दिव्यांग क्षेत्रात कार्य करणा-या सामाजिक
संस्था, संघटना, विविध शासकीय विभाग, दिव्यांग मुलांच्या विशेष शाळा, प्रसार
माध्यमे यांना सदर कार्यशाळेत सहभागी
होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर तथा अध्यक्ष जिल्हा अपंग पुनर्वस्न
केंद्र यांच्या वतीने करण्यात येत आहे.
कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी इंडियन रेडक्रॉस
सोसायटीच्या कोअर कमिटी सदस्य व उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रेडक्रास रक्तपेढीचे चेअरमन डॉ.
प्रसन्नकुमार रेदासनी, कोषाध्यक्ष सतिष चरखा, सहसचिव राजेश यावलकर आणि केद्रांचे नोडल ऑफिसर जी.टी.
महाजन परिश्रम घेत आहेत. असे केद्र प्रमुख जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, जळगाव
यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment