Thursday, 25 October 2018

वजनमापे नुतनीकरणाची प्रक्रीया सुरु


        जळगाव, दि. 25 - वजने मापे उत्पादक/दुरुस्तक/विक्रेते यांचेकडील वजनमापेची सन 2019 या सालाकरीता नुतनीकरणाची प्रक्रीया सुरु झालेली आहे. त्या अनुषंगाने वैधमापन शास्त्र यंत्रणेतील वजने मापे परवानाधारक यांनी त्यांचे परवाने सन 2019 करीता ऑनलाईन सादर करणे बंधनकारक केले आहे.
          वैधमापन शास्त्र यंत्रणेने त्यासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे. त्यामुळे यापुढे सर्व परवानाधारक यांनी त्यांचे उत्पादक/दुरुस्तक/विक्री परवाने हे http://www.vaidhmapan.maharashtra.gov.in:४४३/Homepage/index.htr या संकेत स्थळावरुन नुतनीकरण करण्याचा अर्ज व त्याबाबतची आवश्यक ती कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करावी. याबाबत काही अडचण येत असल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0257/2241149 व भ्रमणध्वनी क्रमांक 9423927404 येथे संपर्क साधावा. असे आवाहन श्री. रा. भ. बांगर, सहायक नियंत्रक, वैधमापन शास्त्र, जळगाव जिल्हा यांनी केले आहे.
०००

No comments:

Post a Comment