जळगाव, दि. 25 - कोतवाल भरती प्रक्रीया 2018 अंतर्गत लेखी परिक्षा
दिलेल्या सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, लेखी परिक्षेअंती मुलाखतीसाठी पात्र
ठरलेल्या उमेदवारांची आवश्यक पात्रता व अर्जात भरलेली माहितीची मुळ कागदपत्रांची
पडताळणी करणे. तसेच अंतरीम स्वरुपात निवड यादी www.jalgaonexam.com या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे. निवड
यादीतील पात्र उमेदवांची 25 गुणांची मुलाखत बुधवार, दिनांक 31 ऑक्टोबर, 2018 रोजी
सकाळी 9.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी
माहिती जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली
आहे.
उपविभागीय
निवड समिती जामनेर व जळगाव उमेदवारांच्या मुलाखती जिल्हाधिकारी यांचे दालनाजवळील
सभागृहात, भुसावळ, बोदवड व मुक्ताईनगर उमेदवारांच्या मुलाखती जिल्हा पुरवठा
अधिकारी यांचे दालन, पाचोरा व भडगाव उमेदवारांच्या मुलाखती उपजिल्हाधिकारी, रोजगार
हमी योजना यांचे दालन, अमळनेर व चोपडा तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखती
उपजिल्हाधिकारी महसुल प्रशासन यांचे दालन, चाळीसगाव तालुक्यातील उमेदवारांच्या
मुलाखती जिल्हा पुनवर्सन अधिकारी यांचे दालन, एरंडोल, धरणगाव व पारोळा तालुक्यातील
उमेदवारांच्या मुलाखती उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालन व यावल व
रावेर तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखती राज शिष्टाचार अधिकारी यांचे दालन येथे
घेण्यात येतील.
लेखी
परिक्षेत मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारास मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीस अनुपस्थित राहणारा उमेदवार अंतीम निवडीसाठी अपात्र ठरेल. प्राप्त
केलेल्या गुणांचे आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी उमेदवारांना शैक्षणिक व इतर
संबंधित मुळ प्रमाणपत्रे (दोन झेरॉक्स संचासहित स्वसाक्षांकित केलेले) तपासणीसाठी
उपलब्ध करुन द्यावे लागतील. अन्यथा तोंडी परिक्षा व अंतिम निवडीसाठी विचार केला
जाणार नाही. असेही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
000
No comments:
Post a Comment