Friday, 26 October 2018

महालेखाकार बेहरा यांच्या हस्ते निवृत्त वेतन कार्यशाळा संपन्न






जळगाव, दि.26:- भारतीय लेखा व लेखा परिक्षक विभाग प्रधान महालेखापाल ( ले.व.ह) -1 मुंबई व जिल्हा कोषागार कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आहरण व संवितरण अधिकाऱ्यांची अडीअडचणीचे निराकरण करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
 या कार्यशाळेचे उदघाटन प्रधान महालेखाकार श्री. ए.के.बेहरा यांनी दीप प्रज्वलीत करुन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर होते. प्रमुख अतिथी म्हणून उप लेखाअधिकारी एस.एस.सरफरे, लेखाधिकारी सी. डी. चिंदारकर सहा.लेखाधिकारी डी. एन. पुजारी, एस. एस. शिंदे, राजकुमार गुप्ता, जेष्ठ लेखाधिकारी श्री. जॉर्ज तापी महामंडळाचे बाळासाहेब घोरपडे जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण सीताराम पंडीत उपस्थित होते.
जिल्हा नियोजन भवनात आयोजित या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. बेहेरा यांनी भविष्य निर्वा‍ह निधी, निवृत्तीवेतन, तपशिलवार देयके, अनुदान देयके आदि विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.  उपस्थित अधिकारी व निवृत्ती वेतन धारकांनी विचारलेल्या शंकाचे समाधान केले. या कार्यक्रमास आहरण अधिकारी,  निवृतीवेतन धारक मोठया संख्येने उपस्थितीत होते.
या कार्यशाळेत श्री. चिंदारकर यांनी पेन्शन प्रस्ताव तयार करणे व सादर करतांना घ्यावयाच्या काळजी बद्दल पावर पॉईट सादरी करणाव्दारे माहिती दिली. सहा लेखाधिकारी श्री. एस.एस. शिंदे यांनी ही मार्गदर्शऩ केले.
 प्रारंभी आज कोषागार अधिकारी कैलास बाळकृष्ण सोनार यांनी प्रस्ताविकात कार्यशाळा आयोजना मागील हेतू विषद केला. उपस्थितांनी आपल्या शंकाचे निरसन करुन घेण्याबाबत आवाहन केले. अपर कोषागार अधिकारी एस. आर. नारखेडे यांनी उपस्थिाचे आभार व्यक्त केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन भागवत पाटील यांनी केले.                                                   ०००

No comments:

Post a Comment